Home » , » 'लेटर बॉम्ब' माझा नाही - प्रणव

'लेटर बॉम्ब' माझा नाही - प्रणव

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:08 AM

दिल्ली केंद्रीय अर्थ मंत्रालयाने टू जी स्पेक्ट्रमसंदर्भात पाठवलेले संबंधित पत्र खुद्द पंतप्रधान कार्यालयासह विविध मंत्रालये व न्यूज चॅनेल्स यांनी या प्रकरणी केलेल्या टिप्पणींचे सारांश होते व त्यात आपल्या व्यक्तिगत मताचा समावेश नव्हता , असे स्पष्ट करणारे ' नवे पत्र ' केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवले असून केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांच्याभोवतीचा वेढा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेला ' लेटर बॉम्ब ' फुसका ठरवण्याचा प्रयत्न अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केला .
'टूजी स्पेक्ट्रम घोटाळा तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम टाळू शकले असते ' अशी टिप्पणी असलेले पत्र अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल्याचे नुकतेच आरटीआयअंतर्गत उघड झाले आहे . त्यावरून निर्माण झालेल्या रणकंदनामुळे यूपीएभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले . या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री मुखर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात वरील मत व्यक्त करत चिदंबरम यांना वेढ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला .
प्रणव - पंतप्रधान - सोनिया भेट ?
टूजी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाला नवरात्रीच्या मुहूर्तावर तिलांजली देऊन यूपीएत सारे काही आलबेल असल्याची ग्वाही देशवासीयांना द्यावी यासाठी प्रणव मुखर्जी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटणार असल्याची चर्चा बुधवारी राजधानीत होती . पंतप्रधान व सोनिया गांधी यांच्यातही चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट होत होते . अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर प्रणव व पंतप्रधान यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही , हे विशेष !
पंतप्रधानांच्या जेवणावळीत चिदंबरम !
टू जीवरून महाभारत रंगले असतानाच गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी मात्र बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला . ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यासाठी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभात पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातील दोनच सहकाऱ्यांना आमंत्रित केले होते . त्यात चिदंबरम यांचा समावेश होता . माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या .
' सरकारच्या कमार् ' वरून हमरातुमरी
दरम्यान , टूजी प्रकरणावरून यूपीएला कोंडीत पकडण्याची संधी भाजपने बुधवारीही साधलीच . यूपीएला पाच वर्षांचा जनादेश आहे , या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर ' हे सरकार आपल्या कर्मानेच पडणार आहे ' अशी प्रतिक्रिया सुषमा स्वराज व अरुण जेटली यांनी व्यक्त केली . काँग्रेसनेही त्यास चोख प्रत्युत्तर देताना टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेची सुनावणी कोर्टात सुरू आहे . स्वामींतर्फे जो युक्तिवाद केला जातो त्यातला शब्दही न बदलता भाजप प्रसिद्धीपत्रके तयार करते . कोर्टाने अद्याप कोणताही निकाल दिलेला नाही , त्यापूर्वीच भाजपला स्वत : चा काल्पनिक निकाल ऐकवायची घाई झाली असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी हाणला .
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger