Home » » राष्ट्राध्यक्षांनी वाहिली म. गांधींना पुष्पांजली

राष्ट्राध्यक्षांनी वाहिली म. गांधींना पुष्पांजली

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:03 AM

स्रोत: तरुण भारत
जिनेव्हा, २ ऑक्टोबर
म. गांधी यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी आज जिनेव्हा येथे त्यांना पुष्पांजली वाहिली. आज सकाळी येथील एरियाना पार्कमध्ये त्या गेल्या व तेथे असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याला त्यांनी फुले वाहिली. तेथे असलेल्या लहान मुलांच्या एका गटाने यावेळी ‘राम धून’ म्हटली. यानंतर राष्ट्राध्यक्षांनी म. गांधी यांच्या पुतळ्याला परिक्रमा घातली. स्वित्झर्लंड व भारत यांच्यात झालेल्या मैत्री कराराला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. भारताच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रेलियाच्या आठ दिवसांच्या दौर्‍यावर येथे आल्या आहेत. भारताच्या स्वित्झर्लंडमधील राजदूत चित्रा नारायणन यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केेलेल्या स्वागत समारंभाला हजर राहिल्यानंतर त्या बर्नकडे रवाना होतील. चित्रा नारायणन् माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांची मुलगी आहे.
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger