Home » » तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चेची आवश्यकता : आझाद

तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चेची आवश्यकता : आझाद

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 9:11 AM

स्रोत: तरुण भारत
हैदराबाद, २ ऑक्टोबर
स्वतंत्र तेलंगणा निर्मितीच्या मुद्यावरून सध्या आंध्रप्रदेशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची केंद्रसरकारला जाणीव आहे. मात्र, तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर आणखी चर्चा होण्याची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आंध्रप्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. कुठलीही कालमर्यादा निश्‍चित न करता या मुद्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, असे आझाद यांनी विजयावाडा आणि प्रकाशम जिल्ह्याच्या दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंध्रप्रदेश सरकारमधील स्वतंत्र तेलंगणा समर्थक कर्मचारी गेल्या १३ सप्टेंबरपासून संपावर आहेत. या कर्मचार्‍यांनी जनतेचे हित डोळ्यापुढे ठेवून ताबडतोब कामावर हजर व्हावे, असे आवाहन आझाद यांनी केले. आझाद, प्रणव मुखर्जी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची शनिवारी दिल्लीत बैठक झाली होती.
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger